महाराष्ट्राच्या ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स संघात आकार सेंटरचे तीन खेळाडू 

  • By admin
  • July 25, 2025
  • 0
  • 190 Views
Spread the love

कल्याण ः कल्याण येथील आकार जिम्नॅस्टिक्स सेंटरच्या तीन खेळाडूंची अखिल भारतीय ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. 

या स्पर्धेत सब ज्युनियर गटाचा चिराग केने हा ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स, अभिप्रीत विचारे हा ज्युनिअर गटात ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सहभागी होईल. वर्या पाटील हा ज्युनियर गटात टम्बलिंग जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

हे तीन खेळाडू देहरादून येथे ८ ते १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही निवड प्रशिक्षक निशांत यशवंतराव, आंतरराष्ट्रीय पदक विजेता व शिवछत्रपती अवॉर्डी प्रशिक्षक अभिजीत शिंदे आणि आकार जिम्नॅस्टिक्सचा खेळाडू व आंतरराष्ट्रीय पदक विजेता ओमकार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकांच्या सततच्या पाठिंब्यामुळे शक्य झाली. संस्थापक  पुष्पा ईश्वर शिंदे यांचे विशेष आभार मानण्यात आले. ज्यांच्या पुढाकारामुळे आज आकार जिम्नॅस्टिक्स हे आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा असलेले प्रतिष्ठित प्रशिक्षण केंद्र बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *