
छत्रपती संभाजीनगर ः योग अँड स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन, सायकलिस्ट फाऊंडेशन, क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिवसनिमित्त शनिवारी (२६ जुलै) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सायकल रॅलीला शनिवारी सकाळी साडेसहा वाजता प्रारंभ होणार आहे. सायकल रॅली हॉटेल लेमन ट्री, सिडको येथून सुरू होईल. सिडको एन ५ येथील जिजामाता कन्या विद्यालय या ठिकाणी सायकल रॅलीचा समारोप होईल.

सायकल रॅलीला प्रमुख अतिथी म्हणून एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर दिपेश सिंह, आमदार संजय केनेकर, देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.
या सायकल रॅलीचे आयोजन डॉ विजय व्यवहारे, उदय कहाळेकर, प्रल्हाद आव्हाळे, राजेंद्र वाणी व गोकुळ तांदळे यांनी केले आहे. या सायकल रॅलीत सायकलपटूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.