
मुंबई ः चौथी चेंबूर जिमखाना राज्य मानांकन स्पर्धा चेंबूर जिमखाना येथे सुरू झाली. स्पर्धेला बँक ऑफ बडोदाचा पुरस्कार लाभला असून बँकेचे मुख्य व्यवस्थापक रवी कुमार यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले.
या प्रसंगी चेंबूर जिमखान्याचे सचिव डॉ मनीष शर्मा, क्रीडा विभागाचे सचिव बाळकृष्ण परब, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, मुंबई उपनगर संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर पुरुष एकेरी गटाने सामन्यांची सुरुवात करण्यात आली.
पहिल्या फेरीत मुंबई उपनगरच्या अमर भोसलेने रायगडच्या मंदार शिंदेला १९-२५, १४-८, २५-१३ अशा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभूत करून दुसरी फेरी गाठली. तर मुंबई उपनगरच्या रहीम शेखने दुसऱ्या फेरीत प्रवेश करताना मुंबईच्या अशोक गायकवाडचा २३-३, ७-२०, २५-४ असा पराभव केला.
पुरुष एकेरी गटातील इतर सामन्यांचे निकाल
सचिव पवार (पालघर) विजयी विरुद्ध प्रदीप बारिया (मुंबई), विशाल तोडणकर (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध एल व्ही कृष्णमूर्ती (मुंबई उपनगर), सचिन बांदल (पुणे) विजयी विरुद्ध सचिन जाधव (मुंबई उपनगर), सूर्यकांत मोरे (मुंबई) विजयी विरुद्ध अमोल गांगल (ठाणे), चिन्मय भांडारकर (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध विनोद बोराळे (मुंबई), सुनील वाघमारे (मुंबई) विजयी विरुद्ध शोएब चौधरी (मुंबई उपनगर), अमेय जंगम (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध शैलेश जाधव (ठाणे), सतीश खरात (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध किरण बोबडे (ठाणे), महेश कुपेरकर (मुंबई) विजयी विरुद्ध देवराज कथाडे (पालघर), अविष्कार मोहिते (ठाणे) विजयी विरुद्ध किरण गुप्ता (मुंबई उपनगर), सत्यनारायण दोंतुल (मुंबई) विजयी विरुद्ध अक्षय देशमुख (ठाणे).