
खेळ आणि खेळाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रत्येक शाळेत उपक्रम राबवावेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
छत्रपती संभाजीनगर ः मला मैदानावर खेळाडू खेळताना दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये खेळ आणि खेळाचे महत्त्व कसे पटवून सांगता येईल, जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत एकाच दिवशी एका तासाचे व्याख्यान आयोजित करावे तसेच क्रीडा विभागातर्फे खेळाडूंना देण्यात येणाऱ्या क्रीडा सुविधा व योजना प्रत्येक खेळाडूपर्यंत कशा पोहचवता येतील यासाठी क्रीडा विभागाने प्रयत्न करावा असा आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे.
जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती संभाजीरनगरची बैठ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनामध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शालेय क्रीडा स्पर्धा मार्गदर्शक पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
या प्रसंगी बैठकीकरीता जिल्हा क्रीडा परिषद सदस्य पोलिस निरीक्षक एस. एस. देशमुख, विस्तार अधिकारी डी टी शिरसाट, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ उदय डोंगरे, जिल्हा सॉफ्टबॉल संघटना सचिव गोकुळ तांदळे, बँक ऑफ महाराष्ट्र (लीड बँक) अधिकारी प्रपित मोघे, जिल्हा माहिती अधिकारी प्रतिनिधी श्रीमती यशोदा ताढे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, मुकूंद वाडकर, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाणे, रेखा परदेशी, खंडू यादवराव, राम मायंदे, पुनम नवगिरे, शिल्पा मोरे, तुषार आहेर आदींची उपस्थिती होती.
तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सर्व शाळांनी सहभागी होण्याचे अनिवार्य करावे या आशयाचे पत्र सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक यांना देण्याचे आदेशीत करण्यात आले असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.
जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ आयोजनाबाबत समितीसमोर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम मागील इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. जिल्हास्तर स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त संघ, खेळाडू यांना पदके व चषक प्रदान करण्याकरीता बैठकीमध्ये चर्चा होऊन मान्यता देण्यात आली. ऑनलाईन प्रणालीमध्ये जिल्ह्याच्या क्रीडा विकासाबाबत प्रत्येक शाळेतील क्रीडा विषयक सोई सुविधांचे करण्यास समितीची मान्यता मिळाली. तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तर स्पर्धांचे आयोजन नियोजन करण्यासाठी पंच म्हणून नियुक्ती पत्र दिल्यानंतर शाळेतून कार्यमुक्त करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळेतील प्राचार्य, मुख्याध्यापक यांना पत्र देण्याचे आदेशीत करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी आभार मानले.