< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); इंग्लंडचा धावांचा पाऊस, रुटचे ३८वे शतक – Sport Splus

इंग्लंडचा धावांचा पाऊस, रुटचे ३८वे शतक

  • By admin
  • July 25, 2025
  • 0
  • 8 Views
Spread the love

भारतीय गोलंदाजांची धोबीपछाड, १८६ धावांची आघाडी 

मँचेस्टर : इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने मँचेस्टरच्या मैदानावर विक्रमांचा पाऊस पाडला. रूट याने आज एकाच शतकासह अनेक महान विक्रम मोडले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रूट दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. रूटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगलाही मागे टाकले आहे. जो रूट याने पाच विक्रम नोंदवले असून नवीन विश्वविक्रम निर्माण केले. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंड संघाने सात बाद ५४४ धावा फटकावत कसोटीवर आपली पकड घट्ट केली आहे. कर्णधार बेन स्टोक्स ७७ धावांवर खेळत आहे. 

कसोटीचा तिसरा दिवस इंग्लंडच्या फलंदाजांनी गाजवला. खास करुन जो रुट याने १५० धावा फटकावत ३८वे शतक साजरे केले. ऑली पोप आणि रुट याने तिसऱ्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदर याने पोप याला ७१ धावांवर बाद केले आणि पाठोपाठ सुंदरने हॅरी ब्रूक (३) याला बाद करुन संघाला एकाच षटकात दोन मोठे बळी मिळवून दिले. त्यानंतर जो रुट आणि कर्णधार बेन स्टोक्स या जोडीने भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवले. रुट याने २४८ चेंडूंचा सामना करत १४ चौकारांसह १५० धावा फटकावल्या. स्टोक्स निवृत्त होऊन परत फलंदाजीला आला. स्टोक्सने १३४ चेंडूत नाबाद ७७ धावा केल्या. त्याने सहा चौकार मारले. डॉसन दोन चौकारांसह २१ धावांवर खेळत आहे. स्मिथ याला ९ धावांवर बाद करुन बुमराहने पहिला बळी घेतला. बुमराह याचा हा इंग्लंडमधील ५० वा बळी ठरला. सिराजने वोक्सला ४ धावांवर क्लिनबोल्ड केले. 

रुटचे विक्रमी शतक
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात जो रूटने १५० धावा केल्या आहेत. यासह, कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या धावा १३,४०९ झाल्या आहेत. रूट याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पॉन्टिंगला मागे टाकले आहे. पॉन्टिंगच्या कसोटीत १३,३७८ धावा आहेत. या सामन्यात ३१ धावा करून रूटने भारताचा महान खेळाडू राहुल द्रविड आणि दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू जॅक कॅलिस यांच्या मागे टाकले आहे. महान खेळाडू सचिन तेंडुलकरचे नाव या यादीत वरच्या क्रमांकावर आहे. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये १५,९२१ धावा केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमधील ३८ वे शतक
जो रूटने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे ३८ वे शतक झळकावले आहे. या शतकासह त्याने कसोटीत श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराची बरोबरी केली आहे. रूटने १५७ सामन्यांपैकी २८६ डावांमध्ये हे ३८ शतके झळकावली आहेत. संगकाराने १३४ सामन्यांपैकी २३३ डावांमध्ये ३८ शतके झळकावली आहेत. भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकरचे नावही या यादीत वरच्या क्रमांकावर आहे. सचिनने कसोटीत ५१ शतके झळकावली आहेत.

भारताविरुद्ध सर्वाधिक शतके
जो रूटच्या कसोटीतील ३८ शतकांपैकी १२ शतके भारताविरुद्ध झळकावली आहेत. मँचेस्टर येथे शतकासह, तो भारताविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध ११ शतके झळकावली आहेत.

ओल्ड ट्रॅफर्ड येथे १००० धावा पूर्ण केल्या
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळला जात आहे. या मैदानावर १००० धावा पूर्ण करणारा रूट जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *