
छत्रपती संभाजीनगर ः ५१ महाराष्ट्र बटालियन एनसीसी विभाग देवगिरी महाविद्यालयाच्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांच्या हस्ते शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. या श्रद्धांजली कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धाच्या संदर्भात पीपीटी प्रदर्शन केले.
या प्रसंगी त्यांनी कारगिल युद्धामध्ये सहभागी झालेल्या शहीद कॅप्टन विक्रम बत्रा शहीद कॅप्टन मनोज कुमार पांडे, ग्रेनेडियर योगेंद्र यादव यांनी कारगिल युद्धामध्ये केलेल्या साहसी कार्यावर प्रकाश टाकला. एनसीसी छात्रांनी राष्ट्रभक्तीपर गीत गाऊन शहिदांना मानवंदना दिली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी कारगिल युद्धामध्ये सैनिकांनी केलेल्या कार्याचा गौरव करून या महान कार्याचे स्मरण तरुणांनी सतत ठेवले पाहिजे व त्यांनी भारतीय सैन्य दल, निमलष्करी दल यामध्ये सहभागी झाली पाहिजे असे आवाहन केले. यासाठी तरुणांनी कसून सराव केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे व आपल्या ध्येयाप्रती सजग राहिले पाहिजे असे आवाहन केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे रेडिओ चॅनेल देवगिरी वाणी ९०.०० एमएम टीमने महाविद्यालय परिसरात येऊन त्यांनी एनसीसी छात्रांच्या कारगिल युद्ध संदर्भातल्या भावना जाणून घेतल्या याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ अपर्णा तावरे, डॉ गणेश मोहिते हजर होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनसीसी विभागाचे प्रमुख मेजर डॉ परशुराम बाचेवाड यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीनियर अंडर ऑफिसर आदित्य दाभाडे, ज्युनिअर अंडर ऑफिसर वैभव गवई, कॉटर मास्टर आयुष गौड, सार्जंट सोमेश आनंदे, आदित्य मोरे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयातील एनसीसी छात्र व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.