
सब ज्युनिअर जिल्हास्तरीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या वतीने विभागीय क्रीडा संकुल येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सब ज्युनिअर जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये आर्या पाटील, आराध्या चव्हाण, श्रेया मोहीम, समर्थ डोंगरे, आयुष अंभोरे, मानक जाधव यांनी आपल्या गटामध्ये वर्चस्व राखत सुवर्णपदक संपादन केले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण भाजप गारखेडा अध्यक्ष संजय बोराडे, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ उदय डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी
डॉ दिनेश वंजारे, सचिन कोरडे, स्वप्निल शेळके, महेश तवार, आकाश आरमाळ, सुरज लिपणे आदी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व पंच म्हणून तुषार आहेर, सागर मगरे, अजय त्रिभुवन, शिल्पा नेने, राहुल दणके, जयदीप पांढरे आदींनी काम पाहिले.
या सर्व खेळाडूंची हिंगोली येथे होणाऱ्या २७व्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या संघात निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेचा अंतिम निकाल
फाईल मुले ः समर्थ डोंगरे, शुभम पाटील, शौर्य चिंचोले, सत्यम पंडित.
फाईल मुली ः आर्या पाटील, स्वामिनी डोंगरे, वैष्णवी कावळे, उमा डोंगरे.
इप्पी मुले ः आयुष अंभोरे, आरो जाधव, मितेश अग्रवाल, आरुष मालोदे.
इप्पी मुले ः आराध्या चव्हाण, कृतिका राठोड, रूपाली शिंदे, आर्या बावळे.
सायबर मुले ः मानक जाधव, वेदांत काळे, सत्यजित कोमटे, स्वराज भोसले.
सायबर मुली ः श्रेया मोहीम, संचिता वारेगावकर, वैष्णवी इंगोले, भूमी सोनवणे.