
छत्रपती संभाजीनगर ः कारगिल दिनानिमित्त जिल्ह्यातील देवगिरी ग्लोबल अकॅडमी स्कूल येथे पहिल्यांदा तीन ते सात वर्षाखालील मुले व मुलींच्या तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी तीन वर्ष ते सात वर्षापर्यंतच्या मुला-मुलींनी सहभाग नोंदविला. अगदी ११ किलो वजनापासून मुली व मुलांच्या सर्व वजन गटात अतिशय अतितटीचे व चुरशीचे सामने पालकांना व पंचांना बघायला मिळाले.
या स्पर्धेचे उद्घाटन राज्य संघटनेचे उपाध्यक्ष नीरज बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभ संघटनेच्या राष्ट्रीय पदक विजेत्या व राष्ट्रीय पंच फोर्थ डॅन ब्लॅक बेल्ट लता कलवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय पंच अंतरा हिरे, कोमल आगलावे, शरद पवार, सागर वाघ, प्रतीक जांभुळकर, यश हिरे, हर्षल भुईंगळ, राधिका शर्मा, श्रेया पराडकर, जयेश पठारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विकास ठोंबरे, रूपाली तुपारे, ऋषिकेश खटके, लावण्या बेडसे, सृष्टी कौशल, पायल गलांडे, आशिष बडाख, निखिल सहानी, ईशानी गवळी, काव्या अग्रवाल.आदींनी परिश्रम घेतले.
स्पर्धेतील पदक विजेते
१४ वर्षांखालील मुली ः सुवर्ण निया विभुते, रौप्य ईशा शिरपेवार, कांस्य न्यासा दांडगे, आबा आपटे, अवंतिका आंबट.
१४ ते १६ किलो ः सुवर्ण रितिका साठे, रौप्य अस्मि डिंकोंडा, कांस्य कनिका दराडे, अक्षिता भाटिया.
१६ ते १८ किलो ः सुवर्ण आरवी दासरी, रौप्य रेचेल ऐनापुरे, कांस्य गुरविंदर कौर सिलेदार, अर्निका जगत, लाविका अग्रवाल.
१८ ते २० किलो ः सुवर्ण वल्लभी गवळी, रौप्य राजनंदिनी गंगावणे, कांस्य ऋतावरी कुलकर्णी, प्रव्या लगड.
२० ते २२ किलो ः सुवर्ण अनुश्री गायकवाड, रौप्य वीरा कदम.
२२ ते २४ किलो ः सुवर्ण सावी सपकाळ, रौप्य सरस्वती बम.
२४ ते २६ किलो ः सुवर्ण ऋत्वि कुलकर्णी, रौप्य निर्विघ्नना राजपूत.
स्पर्धेतील विजेता मुले
१६ किलो खालील मुले ः सुवर्ण ध्रुव संत्रे, रौप्य हार्दिक आहिरे, कांस्य समर्थ गायकवाड.
१६ ते १८ किलो ः सुवर्ण शिवांश भोगले, रौप्य पार्थ गुप्ता, कांस्य निवान खिवंसरा, पियुष दहाडे.
१८ ते २१ किलो ः सुवर्ण मोक्ष संत्रे, रौप्य पृथ्वीराज सिंग, कांस्य अर्जुन श्रीपुरकर, तीर्थ जैन.
२१ ते २३ किलो ः सुवर्ण कृष्णा कदम, रौप्य शौर्य लगड.
२३ ते २५ किलो ः सुवर्ण देवांश नारखेडे, रौप्य अर्जुन वाघ, कांस्य स्वराज अत्रे, हितांश डायना.
२५ किलो पुढील गट ः सुवर्ण शौर्य खडके, रौप्य यशवर्धन पाटील.