
जळगाव: जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन, जिल्हा बॉक्सिंग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात आली. या स्पर्धेतून जळगाव जिल्ह्याचा बॉक्सिंग संघ जाहीर करण्यात आला.
या स्पर्धेचे उद्घाटन जळगाव खासदार स्मिता वाघ यांचा हस्ते करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील १२० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. १५ वर्षाखालील मुले वजन गट ३० ते ३३ विराट कोळी, ३३ ते ३५ कार्तिक भुंडले, ३५ ते ३७ आदित्य पवार, ३७ ते ४० कृष्णा राजपूत, ४० ते ४२ मानस महालकार, ४३ ते ४६ अहान कोंबडे, ४६ ते ४९ हिमांशू झांबरे, ४९ ते ५२ आर्यन सुर्यवंशी, ५२ ते ५५ सिद्धांत सुरवाडे, ५५ तो ५८ तनुज वर्मा, ६४ ते ६७ आर्यन पिवाळ, ७० प्लस गुरमित तेतनी यांनी यश संपादन केले.
१५ वर्षांखालील मुलींच्या वजन गटात ३७ ते ४० जानव्ही पोटपालीवार, ४० ते ४३ प्रेरणा नवगिरे, ४३ ते ४६ निकिता सोनावणे, ४६ ते ४९ अनुष्का सपकाळे, ४९ ते ५२ प्रशिका वाघमारे, ५५ ते ५८ आकांक्षा वाणी या खेळाडूंनी यश मिळवले.
१३ वर्षांखालील मुलींच्या वजन गटात २६ ते २८ मानसी कोळी, २८ ते ३० लावण्या झाम्बरे, ३०-३२ आरोही पाटील, ३२-३४ पूर्वा झाम्बरे यांनी यश संपादन केले. ११ वर्षांखालील मुली वजन गट २२ ते २४ आराध्या नरवाडे, ३६ ते ३८ साक्षी चांडाले खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करती विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
जळगाव येथे ३१ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यच्या संघात जागा निश्चित केली. सदर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास १५०० खेळाडू, कोचेस तसेच क्रीडाप्रेमी जळगावमध्ये दाखल होणार आहेत. संघाचे प्रशिक्षक म्हणून पवन शिरसाठ, धीरज सोनवणे, अनिल सपकाळे, सागर निकम, मनोज सूर्यवंशी, रोहित जंजाळे यांची निवड झाल्याबद्दल जळगाव जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जळगाव बॉक्सिंग अध्यक्ष श्रीकृष्ण बेलोरकर, जळगाव बॉक्सिंग चेअरमन निलेश बाविस्कर, सुनील नवगिरे, सी आर गुप्ता, नरेंद्र मोरे, मनोज सुरवाडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
पंच म्हणून भूषण पाटील, संतोष सुरवाडे, मनीष नेमिया, अलिशानाज शेख, माहेश्वरी चोपडे, गौरी जाधव, विनीत सुरवाडे यांनी काम पाहिले.