
येवला वॉरियर्स संघ उपविजेता
येवला ः येवला तालुका मान्सून क्रिकेट स्पर्धेमध्ये एस्पियर मालेगाव संघाने विजेतेपद पटकावले तर येवला वॉरियर्स संघ उपविजेता ठरला.
येवला तालुका क्रिकेट असोसिएशन, येवला मुद्रा स्पोर्ट्स आयोजित १४, १६, १८ वर्षीय मान्सून लीग स्पर्धेत एकूण ८ संघानी सहभाग घेतला होता. येवला, वायटीसीए, मालेगाव, नांदगाव, एसपीयर मालेगाव, निफाड, पिंपळगाव बसवंत, के के वाघ या संघामध्ये अटीतटीचे सामने झाले.
उपांत्य फेरीत येवला, मालेगाव, वायटीसीए, एस्पियर मालेगाव या संघात सामना झाला.अंतिम सामना एस्पियर मालेगाव आणि येवला वॉरियर्स यांच्यात झाला. एस्पियर मालेगाव संघाने प्रथम फलंदाजी करत १७४ धावा काढल्या. येवला वॉरियर्स संघाला १७५ धावांचे लक्ष्य देण्यात आले. येवला वॉरियर्स संघ १६ षटकात सर्वबाद १०९ धावा काढू शकला. एस्पियर मालेगाव संघाने विजेतेपद पटकावले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे येवला तालुका क्रीडा प्रमुख नवनाथ उंडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. अजय रामदास पारखे यांनी आभार व्यक्त केले. येवला तालुका क्रिकेट असोसिएशनच्या सुदेश खैरनार, कार्तिक शिंदे, अविष्कार चव्हाण, अमोल राजगुरू, सुदर्शन आहेर, रणवीर परदेशी, रितेश निकम, साई वाबळे, आदित्य देशमुख, आदित्य मोतीवाले, हमजा शेख, मोईन शेख, पार्थ पहिलवान, सौरभ शिंदे, विकास देशमुख, आदित्य खैरे या सर्व खेळाडूंनी मेहनत घेतली आहे.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
सामनावीर – दक्ष हिरे (मालेगाव)
फलंदाज – विहान पटणी (येवला)
गोलंदाज – उद्धव घोंगडे (मालेगाव)
मालिकावीर – प्रेम मोरया (मालेगाव)