
परभणी ः महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशन तसेच सोलापूर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांचा संयुक्त विद्यामाने २२ ते २५ ऑगस्ट या कालावधीत १७ वर्षांखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्याकरिता परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील निवड चाचणी २ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्रशाला मानवत मैदानावर होणार आहे. सदरिल चाचणीसाठी परभणी जिल्ह्यातील १ जानेवारी २००९ व त्यानंतर जन्मलेले सर्व खेळाडू निवड चाचणीसाठी पात्र राहतील. तरी
परभणी जिल्ह्यातील सर्व पात्र खेळाडूंनी https://forms.gle/HKAXtWcFyKegp76T8 या लिंक वर आपली माहिती भरून किंवा 9881620929, 9325584737, 7517831818 संपर्क करून आपले रजिस्ट्रेशन करावे. रजिस्ट्रेशन झालेल्याच खेळाडूंना निवड चाचणी करिता संधी दिली जाईल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्या शाळा महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, आधार कार्ड चे झेरॉक्स व दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन निवड चाचणीच्या नियोजित कालावधीत उपस्थित रहावे, असे आवाहन परभणी जिल्ह्याचे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव शेख मुजीब यांनी केले आहे.