
रत्नागिरी ः चिपळूण येथे २ ते ४ ऑगस्ट दरम्यान होणार्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी गणराज क्लब रत्नागिरीने तब्बल २० खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.
या स्पर्धेसाठी संघ प्रशिक्षक म्हणून रंजना मोंडूला आणि प्रशांत मकवाना हे काम बघणार आहेत. या स्पर्धेकरीता रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन गणराज तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष पुजा शेट्ये, उपाध्यक्ष साक्षी मयेकर, स्नेहा मोरे, परेश मोंडूळा, शलाका जावकर आणि समस्त पालक वर्ग यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने व शहानुर तायक्वांदो अकॅडमी चिपळूण यांनी आयोजित केलेली जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा २ ते ४ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. स्वामी मंगल हॉल बहादुर शेख नाका चिपळूण येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत गणराज तायक्वांदो क्लबचे २० खेळाडू सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेकरीता जिल्हाभरातून सुमारे ६०० खेळाडू आपला सहभाग नोंदवतील. पूमसे व क्यूरोगी प्रकारात ७, १२, १४, १८ वर्षाखालील व १८ वर्षांवरील या वयोगटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात येईल. सुवर्णपदक विजेता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल. पदक संख्येनुसार सांघिक प्रथम, द्वितीय, तृतीय असे पारितोषिक दिले जाणार आहे.