
छत्रपती संभाजीनगर ः कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या पश्चिम भारतीय स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सहा खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यांनी टीम गेम, टीम टार्गेट, टीम डिस्टन्स तसेच वैयक्तिक डिस्टन्स व वैयक्तिक टार्गेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करत ८ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्य अशी १६ पदकांची कमाई करत स्पर्धा गाजवली.या पदक विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक प्रणव तारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
पदक विजेते खेळाडू
बिबीषन चव्हाण २ सुवर्ण पदक व २ रौप्य पदक, रोहित राठोड २ सुवर्ण पदक व १ रौप्य पदक, भाग्येश हावळे २ सुवर्णपदक व १ रौप्यपदक, आदित्य राठोड ३ कांस्यपदक, संदेश राठोड २ सुवर्णपदक आणि १ रौप्यपदक.