
छत्रपती संभाजीनगर ः बजाजनगर भागातील विस्डम इंग्लिश स्कूलमध्ये पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योगपती जुगल किशोर काबरा व विजया काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा अकबर बेग, शाळेचे डायरेक्टर अजगर बेग, संस्थेच्या संचालिका इश्रत बेग यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण प्रणिती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते शाळेचा मानाचा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

संस्थेच्या संचालिका इश्रत बेग यांनी मतदानाचा अर्थ समजावून सांगितला. लोकशाही भारत देशात मतदानाचा हक्क बजावताना त्याचे किती महत्व आहे जसे अर्ज भरणे, अर्जाची छाननी करणे, अर्ज माघारी घेणे, प्रचार करणे व नंतर मत मोजणी करून अंतिम निकाल घोषित करणे, या सर्व बाबीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र प्रमुख, सहाय्यक निरीक्षक अधिकारी असे सर्व नियोजन आले व यावर संस्थेच्या संचालिका इश्रत बेग यांनी मार्गदर्शन केले.
या निवडणुकीत शालेय विद्यार्थी प्रतिनिधी, हाऊस कॅप्टन व बाकी उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तर विजयी उमेदवारांना त्यांच्या कार्याबद्दल सूचना करून त्यांचा सर्वांच्या साक्षीने शपथ विधी घेण्यात आला. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा व मतदानाचे महत्व समजावे म्हणुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते.
विद्यार्थी प्रतिनिधी रिहान शेख, विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रांजल देशमुख, रेड हाऊस कॅप्टन केशव चव्हाण, व्हाईस कॅप्टन मयुरी काकडे, ब्लू हाऊस कॅप्टन अंकुश कुसवा,
व्हाईस कॅप्टन मंजुषा दाभाडे, ग्रीन हाऊस कॅप्टन कार्तिक वाघचौरे, व्हाईस कॅप्टन श्रावणी कापसे, येलो हाऊस कॅप्टन श्रेयस पसकर, व्हाईस कॅप्टन मंजुषा सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षक प्रतिनिधी म्हणून पूनम पाटील उप प्रतिनिधी अश्विनी उगले, शिक्षक मॅनेजर वंदना चावरे, शिक्षक कोऑर्डिनेटर निशिगंधा तायडे, कविता काटपल्ले, क्रीडा प्रतिनिधी प्रा कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा अकबर बेग, डायरेक्टर अजगर बेग व ईश्रत बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांचा शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या पूनम पाटील, अश्विनी उगले, वंदना चावरे, निशिगंधा तायडे, स्नेहल पाटील, ज्योती कापसे, शुभांगी बावीस्कर, कविता काटपल्ले, आरती डहाळे, शितल खैरनार, ज्योती गायके, गायत्री पवार, सारिका पवार, पूजा कवडे, मयुरी वानखडे, बालिका कांबळे, मीनाक्षी परदेशी, पूजा कवडे, अर्चना पांडे, अनुजा वैद्य, मेघा सुरडकर, व्यंकटेश वैष्णव, श्याम जाधव व शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा कैलास जाधव व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यामातून शाळा नेहमी प्रयत्नशील राहते असे मत संस्थेच्या संचालिका ईश्रत बेग यांनी व्यक्त केले.