
अंबरनाथ (सुरेखा कुटाळ) ः ठाणे जिल्हा योगासन क्रीडा स्पर्धेत संजीवनी प्रतिष्ठान अध्यापक विद्यालय, कुरुंद येथील बीएड विभागातील विद्यार्थिनी सुरेखा अनिल पाबळे हिने सुपाइन वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच, तिने फॉरवर्ड बेंड वैयक्तिक गटात चौथे स्थान मिळवून योग क्रीडेत आपले कौशल्य सिद्ध केले.
सुरेखा पाबळे हिने खालील योग प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत: योगवर्धी संस्था अंबरनाथ येथून २०० तासांचा आंतरराष्ट्रीय योग शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम आशीर्वाद महाविद्यालय, नाशिक येथून योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम पतंजली एटीटीसी व निसर्गोपचार संबंधित विशेष प्रशिक्षण ही कामगिरी विद्यार्थिनीच्या सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि योगाभ्यासातील प्रगाढ निष्ठेचे फलित असून संजीवनी प्रतिष्ठानच्या शैक्षणिक गुणवत्ता व प्रशिक्षण पद्धतीचे प्रतीक आहे. संस्थेचे प्राचार्य, शिक्षकवृंद व मार्गदर्शकांनी सुरेखाचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Great news