< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); जलतरण स्पर्धेत संविधान, अमेय, देवांश, भाग्येश, कनिष्कची शानदार कामगिरी – Sport Splus

जलतरण स्पर्धेत संविधान, अमेय, देवांश, भाग्येश, कनिष्कची शानदार कामगिरी

  • By admin
  • July 29, 2025
  • 0
  • 107 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः बाल कल्याण संस्था पुणे व स्पेशल ऑलिम्पिक भारत (महाराष्ट्र) यांच्या विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्पर्धेची महाराष्ट्र निवड चाचणी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या जलतरण तलावात नुकतीच पार पडली आहे. या स्पर्धेत मुंबई येथे ४ ते ६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्पेशल ऑलिम्पिक भारत राष्ट्रीय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली.

या निवड चाचणीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बौद्धिक अक्षमता असलेल्या खेळाडूंनी सहभागी होत चमकदार कामगिरी केली. यात संविधान गाडे, अमेय कुलकर्णी, देवांश आहेवाड, भाग्येश देशमुख, यशराज जीवरग, कनिष्क दांडगे यांचा समावेश होता.

स्पर्धेचा अंतिम निकाल

संविधान गाडे याने या स्पर्धेत ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात रौप्यपदक जिंकले. तसेच त्याने १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक आणि ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदक जिंकले. अमेय कुलकर्णी याने १०० मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात आणि २०० मीटर फ्री स्टाईल अशा दोन्ही प्रकारात रौप्यपदक पटकावले. देवांश आहेवाड याने १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात व २०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. भाग्येश देशमुख याने १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदक संपादन केले. कनिष्क दांडगे याने २०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्ण तर १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात रौप्यपदक जिंकले. यशराज जीवरग याने ५० मीटर आणि १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सहभाग घेतला.

या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पंच अभय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. खेळाडूंसोबत संघ प्रशिक्षक-व्यवस्थापक म्हणून अजय दाभाडे यांनी काम पाहिले.खेळाडूंना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, जिल्हा पॅरालिम्पिक संघटनेचे त्र्यंबक तुपे, डॉ पवन डोंगरे, रुस्तुम तुपे, रवींद्र राठी, संदीप चव्हाण, प्रदीप बुरांडे, माधव गौन्ड, निखिल पवार आदींनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *