
मुंबई ः दि मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक प्रचारासाठी शारीरिक शिक्षण शिक्षक उमेदवार गंगाधर गजलवार, नीता जाधव, प्रभाकर हजारे आणि आर टी कदम यांच्या प्रचाराचा नारळ मंगळवारी चेंबूर एम पश्चिम येथे विभागीय कार्यालयात करण्यात आला.
या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आश्वासन शारीरिक शिक्षण शिक्षक युनिटचे प्रमुख कार्यवाह डॉ जितेंद्र लिंबकर यांनी त्यांना दिले. या प्रसंगी रघुनाथ सोनवणे, कनिष्ठ पर्यवेक्षक चंद्रकांत घोडेराव, डॉ भारती ढोकरट, स्मिता पोतदार, तसेच विभागातील सर्व शारीरिक शिक्षण शिक्षक उपस्थित होते.