
छत्रपती संभाजीनगर ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते, माजी उपमहापौर, गटनेता तसेच स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (३१ जुलै) थ्री ऑन थ्री बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वाभिमान क्रीडा मंडळातर्फे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा २००९ पासून घेतली जात आहे. थ्री ऑन थ्री बास्केटबॉल १२, १४, १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात घेण्यात येणार आहे. तसेच ड्रिबलिंग आणि शूटिंग बास्केटबॉल स्पर्धाही घेतली जाईल. ही स्पर्धा वयोगट ३, ५, ७, ९, ११, १३, १५ वर्षांखालील मुला-मुलींसाठी असेल, अशी माहिती संयोजक पंकज परदेशी यांनी दिली.
सिडको एन ३ मधील शिवछत्रपती कॉलेज समोरील बास्केटबॉल कोर्ट येथे गुरुवारी ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संघ व खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक पंकज परदेशी यांनी केले आहे.