
सोलापूर ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मदतीने सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे अंडर १९ महिला क्रिकेट स्पर्धा बुधवारपासून घेण्यात येणार आहे, अशी माहिती सचिव चंद्रकांत रेंबुर्स यांनी दिली.
शिरपूर येथे अंडर १९ महिला क्रिकेट स्पर्धा होणार होती. परंतु, शिरपूर येथे मुसळधार पावसामुळे अंडर १९ महिला क्रिकेट सामन्यात खूप अडथळे येऊ लागले. काही सामने शिरपूर येथे झाले. परंतु, पावसामुळे सातत्याने अडथळा येत असल्याने आता पुढील अंडर १९ महिला क्रिकेट सामने सोलापूर क्रिकेट असोसिएशन आयोजित करणार आहे. या सामन्यांना बुधवारपासून सुरुवात होणार आहे आणि आम्ही हे सामने यशस्वी करू, असे सचिव चंद्रकांत रिबूर्स यांनी स्पोर्ट्स प्लस या क्रीडा दैनिकाशी बोलताना सांगितले.
अंडर १९ महिला क्रिकेट सामने इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार असून सर्व तयारी करण्या आली आहे. स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा सर्व कर्मचारी स्टाफ प्रयत्नशील आहे असे सचिव चंद्रकांत रेंबुर्स यांनी सांगितले.