< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखचा राज्य सरकारकडून गौरव होणार ! – Sport Splus

वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखचा राज्य सरकारकडून गौरव होणार !

  • By admin
  • July 29, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

नागपूर ः जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावून ‘ग्रँडमास्टर’ किताब मिळवणाऱ्या नागपूरच्या दिव्या देशमुख हिचा राज्य शासनाच्या वतीने लवकरच सन्मान केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

अवघ्या १९ व्या वर्षी दिव्याने अंतिम फेरीत अनुभवी कोनेरू हम्पी यांना पराभूत करत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत दुसऱ्यांदा सहभागी होत तिने यशोशिखर गाठले असून, आतापर्यंत विविध स्पर्धांत २३ सुवर्ण पदकांसह एकूण सुमारे ३५ पदके पटकावली आहेत.

दिव्याच्या या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बुद्धिबळासारख्या खेळात भारतीय महिला खेळाडूंनी घेतलेली झेप लक्षणीय आहे. दिव्या आणि कोनेरू हम्पी यांच्या चाली या तोडीस तोड होत्या आणि या दोघींनीही आपल्या खेळीने इतिहास रचला आहे. यातून भारताला आणखी एक ग्रँडमास्टर मिळाला असून तेही महाराष्ट्रातून हे विशेष अभिमानास्पद आहे.

दिव्या आणि कोनेरू यांचे हे यश देशातील उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना प्रेरणा देणारे असून, भारताच्या क्रीडा लौकिकात मोलाची भर घालणारे आहे. दिव्याच्या सातत्यपूर्ण यशामागे असलेल्या तिच्या प्रशिक्षकांचे, मार्गदर्शकांचे तसेच कुटुंबीयांचे योगदानही मोठे आहे. ग्रँड मास्टर दिव्या देशमुख हिच्या या विश्वविजयी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री यांनी तिला मनापासून शुभेच्छा दिल्या असून, येणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेतही दिव्या असा विजय मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *