
ठाणे (सतीश पाटील) ः वर्तक नगर पोलीस ठाणे व कॉस फाउंडेशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आर जे ठाकूर कनिष्ठ महाविद्यालय ठाणे येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी “गुन्हे आणि सायबर गुन्हे” या महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाची संकल्पना ठाणे पोलीस आयुक्त आशितोष डुंबरे यांची होती. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमात वर्तक नगर पोलीस ठाणेचे पीएसएय सतेज जाधव यांनी सायबर गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रतिबंधक उपाय यावर अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
कॉस फाउंडेशनचे अध्यक्ष जितेश मोरे सर व उपाध्यक्ष कल्पना मोरे यांनी विद्यार्थिनींना गुड टच – बॅड टच, महिला अत्याचार, व्यसनमुक्ती, मुलींचे मूलभूत हक्क व अधिकार तसेच करिअर मार्गदर्शन या विषयांवर प्रबोधन केले.
आरएसपी अधिकारी सतीश पाटील यांनी वाहतुकीचे नियम, वाहतुकीमुळे होणारे फायदे व संभाव्य अपघात यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षेबरोबरच समाजाची जबाबदारी कशी घ्यावी व खेळामार्फत आत्मविश्वास कसा वाढवावा याचे उत्तम मार्गदर्शन दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र मोरे यांनी आपल्या अनुभवातून प्रेरणादायी उदाहरणे देत विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवली.
कार्यक्रमासाठी कॉस फाउंडेशनचे रुद्र मोरे, भाग्यश्री मनोरे मॅडम, सुरज कदम यांचे विशेष सहकार्य लाभले. आर जे ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पवार, विजय निकम, अमित जोशी, संजय कुलाल तसेच सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.