ठाणे ः सालाबाद प्रमाणे यंदाही प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या शनिवारी, २ ऑगस्ट रोजी टीएमसी स्टेडियम, मुंब्रा, ठाणे येथे १९ वर्षांखालील यूथ अॅथलेटिक्स स्पर्धा आयोजित केली आहे.
ठाणे आणि नवी मुंबई जिल्ह्यातील ५० पेक्षा विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील ४०० हून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. भारतासाठी ऑलिम्पियन्स खेळाडू घडवण्याचे ध्येय आयोजकांनी ठेवले आहे. ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने स्पर्धा होत आहे. स्पर्धेला सकाळी आठ वाजता सुरुवात होईल. १४, १७, १९ वर्षांखालील विविध वयोगटात स्पर्धा, शर्यती होतील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९९२०११९२५४ आणि ९८२०३८२११७ यावर संपर्क साधावा.