जळगाव : टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्यावतीने जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिन व डॉ व्यंकटेश वांगवाड यांच्या जन्मदिनानिमित्त ३ ऑगस्ट रोजी जळगाव येथे महाराष्ट्र राज्य टेनिस व्हॉलीबॉल पंच परीक्षा व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा सचिवांसह प्रत्येक जिल्ह्यातील किमान पाच पंच आणि क्रीडा शिक्षक कार्यशाळेस उपस्थित राहावे. रविवारी (३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता उपस्थित राहण्यासाठी कळवावे. नोंदणी शुल्क ५०० रुपये भरुन ३१ जुलैपर्यंत नावनोंदणी करावी. सोबत किट साईज नंबर द्यावा. सहभागी पंच आणि क्रीडा शिक्षक यांना प्रमाणपत्र व टी-शर्ट देण्यात येणार आहे.
नावनोंदणीसाठी निलेश माळवे (7720022064), गणेश पाटील (8888287773). राज्य सहसचिव प्रशांत कोल्हे यांच्याशी संपर्क साधावा. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा सचिव यांना जास्तीत जास्त पंच व क्रीडा शिक्षक यांना उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, संस्थापक अध्यक्ष डॉ व्यंकटेश वांगवाड, राज्य अध्यक्ष: सुरेश रेड्डी क्यातमवार, कार्याध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ, उपाध्यक्ष आनंद खरे, किशोर चौधरी, रामेश्वर कोरडे, राज्य सरचिटणीस गणेश माळवे यांनी केले आहे.