
एरोबिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धा
अमरावती ः श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये सराव करणाऱ्या अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या २७ खेळाडूंची २५व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी अमरावती संघात निवड झाली होती. या स्पर्धेत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या खेळाडूंनी २२ पदकांची कमाई करून स्पर्धा गाजवली.
सदर स्पर्धा या महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या मान्यतेने, अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक्स संघटना व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यातील एकूण ३०८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या सर्वांशी स्पर्धा करत विविध वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या खेळाडूंनी ५ रौप्य आणि १७ कांस्य पदके जिंकली.
सदर स्पर्धेत ओवी राऊत, विभा भारती व श्रिया फुणे यांनी पदार्पणातच उत्कृष्ट कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात सिद्धी ठाकरे, सुखदा हंबर्डे यांनी अनुक्रमे चतुर्थ आणि पाचवे स्थान प्राप्त केले, तर मिश्र दुहेरी प्रकारात मेधावी देशमुख व श्रवण कुऱ्हेकर आणि पुरुष एकेरी प्रकारात देवांश माहुलकर यांनी अनुक्रमे चतुर्थ आणि पाचवे स्थान पटकावले.
या सर्व खेळाडूंना जिम्नॅस्टिक्स विभाग प्रमुख प्रा आशिष हटेकर यांचे मार्गदर्शन आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ निलेश जोशी, हेमा जोशी, राजवैद्य, सचिन कोठारे, अक्षय अवघाते यांचे प्रशिक्षण लाभले. त्याच सोबत डॉ निलेश जोशी आणि हेमा जोशी, राजवैद्य यांनी स्पर्धेतील पंच मंडळाची देखील जबाबदारी सांभाळली. या यशाबद्दल श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डॉ श्रीकांत चेंडके, कार्याध्यक्ष ॲड प्रशांत देशपांडे, जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष प्रा रवींद्र खांडेकर, उपाध्यक्ष डॉ विकास कोळेश्वर, कोषाध्यक्ष प्रा राजेश पांडे, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व जिल्हा संघटना सचिव तसेच महाराष्ट्र राज्य संघटना उपाध्यक्ष डॉ माधुरीताई चेंडके, प्राचार्य डॉ श्रीनिवास देशपांडे, प्रा दीपा कान्हेगावकर, जिम्नॅस्टिक्स विभाग प्रमुख प्रा आशिष हटेकर, प्रा कमलाकर शहाणे, मधुकर कांबे, अनंत निंबोळे, डॉ कविता वाटाणे, प्रा विलास दलाल, राजेश महात्मे, डॉ ललित शर्मा, प्रा नंदकिशोर चौव्हाण, विकास पाध्ये, रवी दलाल तसेच सर्व पालकांनी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.
पदक विजेते खेळाडू
मिनी वयोगट : ओवी राऊत, विभा भारती व श्रिया फुणे (मिश्र तिहेरी) – कांस्य पदक
सब ज्युनियर गट :रिशिका राजोटे, आर्यन कसुळकर, अर्णव झांबरे, गुरुराज धरमाळे व सौरभ काळोने (समूह) – रौप्य पदक चित्राली येवतकर, सिद्धी ठाकरे, आर्या तिरथकर, सिद्धी गुल्हाने, रिद्धी गुल्हाने, उमंग सोळंके, अंतरा झांबरे व सान्वी नागपुरे (एरो डान्स) – कांस्य पदक
ज्युनियर गट : जिज्ञासा खोकड (महिला एकेरी) – कांस्य पदक जिज्ञासा खोकड, वेदांत हरणखेडे, याशिका दीक्षित, रागिणी लोखंडे व देविका साहू (समूह) – कांस्य पदक