
बुलढाणा ः जिल्हा क्रीडा संकुल जाभरूळ रोड बुलढाणा येथे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अधिपत्याखाली बॅडमिटन स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्हातील ६ तालुक्यातील १४ बॅडमिंटन क्लबच्या एकूण ९१ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला.
स्पर्धा उद्घाटन प्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव प्रा सुनील सपकाळ, डॉ विनायक हिंगणे, जिल्हा संघटनेचे सचिव विजय पळसकर, डॉ कैलास पवार, बाबा खान आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेते व उपविजेत्या खेळाडूंना आगामी काळात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याची माहिती बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव विजय पळसकर यांनी सांगितले. स्पर्धेत पंच म्हणून दर्शन बावणे, प्रफुल्ल वानखेडे, अतुल हाडे, शिवा इंगळे, अविनाश येतरीकर, गौरी बावणे, रामदास रेवस्कर आदींनी काम पाहिले.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकार, बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मनीष लखानी व आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेश उभरहाडे, स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरचे अध्यक्ष प्रा. नितीन भुजबळ आदींची उपस्थिती होती आणि या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी, मेडल्स व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
९ वर्ष मुले ः १. ईशांत पाटील, २. मिहीर सोनुने. मुली ः १. आशानंदिनी टेकाळे, २. आशांगी टेकाळे.
११ वर्ष मुले ः १. पार्थ काळुसे, २. सर्वेश चोपडे. मुली ः १. गार्गी पाटील, २. शिवण्या सरोदे.
१३ वर्ष मुले ः १. पार्थ पवार, २. निर्भय भोंडे. मुली ः १. समिधा कांबळे, २. स्वरा अंभोरे.
१५ वर्ष मुले ः १. स्वरूप सोनोने, २. विवान वाघ. मुली ः १. आकांक्षा कुंडे, २. प्रियदर्शनी घोगले.
१७ वर्ष मुले ः १. करण सावळे, २. श्रीलिन पवार. मुली ः १. सायली वाढे, २. आरुषी काळुसे.
१९ वर्ष गट ः १. परीक्षित आमले, २. साकार धाकते.
पुरुष गट ः १. अतुल हाडे, २. वरद हिंगे.