
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या क्रीडा विभागातील प्राध्यापक रहिम खान यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शारीरिक शिक्षण विषयात पीएच डी पदवी प्रदान केली आहे.
प्रा रहीम खान यांनी ‘अ स्टडी ऑन द सलेक्टेड फिजिकल अँड मोटर फिटनेस कंपोनेंट्स ऑफ लॉन टेनिस अँड क्रिकेट प्लेयर्स ऑफ मराठवाडा रीजन’ या विषयावर डॉ रफीक मोहम्मद एजाज सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन पूर्ण केले.
या घवघवीत यशाबद्दल महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, परीक्षा नियंत्रक डॉ एच एच शिंदे, अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, अधिष्ठाता डॉ जाॅन चेल्लादुराई, संचालक नितीन घोरपडे, विभागप्रमुख डॉ दिनेश वंजारे आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच सर सय्यद महाविद्यालयाच्या ट्रस्टी डॉ शमामा परवीन, प्राचार्य डॉ शेख कबीर अहमद , डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागप्रमुख डॉ कल्पना झरीकर, डॉ सईदुद्दीन, डॉ अमरदीप असोलकर, डॉ सदाशिव जवेरी, डॉ शशिकांत सिंग, डॉ श्रीनिवास मोतियेळे, सोहेल अहमद खान, निलेश खरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.