
विभागीय क्रीडा संकुलात निवड चाचणीचे आयोजन, खेळाडूंचा मोठा प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय बास्केटबॉल संघ निवड चाचणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या निवड चाचणीत ५३ मुलांचा तर ३३ मुलींचा सहभाग होता.
पुणे येथे दिनांक ९ ते १४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या १८ वर्षांखालील मुले आणि मुलींसाठी ७५ व्या कनिष्ठ वयोगटांच्या आंतर-जिल्हा राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघाच्या निवडीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा व तालुका बास्केटबॉल असोसिएशन आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निवड चाचणीचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. या निवड चाचणीत खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यात मुलांच्या गटात एकूण ५३ तर मुलींच्या गटात एकूण ३३ मुलींचा सहभाग लाभला.
उपरोक्त नमूद निवड चाचणीचे आयोजन जिल्हा व तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव मंजितसिंग दारोगा व छत्रपती संभाजीनगर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव गणेश कड यांच्या उत्कृष्ट नियोजनात व कुशल देखरेखीत अत्यंत यशस्वीपणे पार पडले.
निवड चाचणी समितीत मुलांच्या गटात आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू विपूल कड, राष्ट्रीय खेळाडू शुभम गवळी व राष्ट्रीय पंच रौनकसिंग यांनी तर मुलींच्या गटासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संदीप ढंगारे, राष्ट्रीय खेळाडू सौरभ ढीपके व नीतू संभेराव यांनी काम पाहिले व संभाव्य खेळाडूंच्या नावांची शिफारस केली. सादर केलेल्या यादीस मंजितसिंग दारोगा व गणेश कड यांनी तत्वतः मान्यता दिल्यानंतर चॅम्पियन्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अॅड संजय डोंगरे यांनी संभाव्य खेळाडूंची यादी सर्वांच्या उपस्थितीत जाहीर केली. यावेळी प्रशांत बुरांडे, किरण परदेशी, आकाश टाके, विजय मालकर, अजय सोनवणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
संभाव्य खेळाडू
मुली ः रुत्विक त्रिभुवन, आकृती बाहेती, गार्गी पाटील, सुरमी भागवत, मोहिशा खांडे, कृष्णा गायकवाड, पलक मोरे, मोनिका सोदी, केतकी ढंगारे, कनिष्का गायकवाड, उज्वल खाडे, प्रतीक्षा बरातीये, श्रावणी देशमुख, राधिका गवळी, सानिका तिदर, हर्षिका शर्मा, गौरी लकडे, परिशी जैन, शौर्या कुंधारे. प्रशिक्षक विपूल कड व अजय सोनवणे.
मुले ः विनायक निकम, जय निकम, रिषभ कपूर, आदित्य खांडेकर, राज मालकर, युवराज करवा, सुदर्शन जाधव, पार्थ देवळांकर, विश्वप्रताप राजपूत, अश्विन आमटे, सुमित पवार, जय गुप्ता, नमन कासलीवाल, राजवीर मुनोत, आर्य शिरसाठ, आर्यन पवार, अथर्व नाईक, सार्थक साखरे, साहिल उंदिरवाडे व प्रशांत जाधव. प्रशिक्षक रौनक सिंग व शुभम गवळी.