
रायगड ः नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी आणि अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील आठ खेळाडूंनी सहभाग घेतला होता आणि या खेळाडूंनी शानदार कामगिरी बजावत आठ पदकांची कमाई केली.
रायगड जिल्ह्यातील आठ खेळाडूंनी सहभाग घेत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य अशी आठ पदके पटकावली. इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष पाशा अत्तार व पदाधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याचे जाहीर करून शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत निसर्गा गवळी, दिशांत भोईर यांनी सुवर्णपदक पटकावले. दिशा शेळके, ध्रुवेद जंगले यांनी रौप्यपदकाची कमाई केली. गायत्री डामसे, वैदेही जाधव, जय डामसे व चिराग अडूरकर या खेळाडूंनी कांस्य पदक संपादन केले.
रायगड जिल्हा थाई बॉक्सिंग संघात माथेरान वॅल्ली स्कूलच्या मुलांचा सहभाग होता. या यशस्वी खेळाडूंचे भारत एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकारी व मुख्याध्यापिका मृदुला पटेल, अधीक्षक महेश लाड, सुपरवायझर मीना अंबोरे व कुंदा पाटील तसेच मनिषा घोलिंडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच रायगड जिल्हा थाई बॉक्सिंग अध्यक्ष स्वप्निल अडूरकर व सचिव मोहिनी अडूरकर व क्रीडा प्रशिक्षक करण बाबरे यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले आहे.