
मुंबई ः शारीरिक शिक्षण शिक्षक युनिट मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पुरस्कार प्राप्त शारीरिक शिक्षण शिक्षिका लीना धुरी या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवली होती.
शारीरिक शिक्षण शिक्षक युनिटतर्फे लीना धुरीा यांचा शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शारीरिक शिक्षण युनिटचे पदाधिकारी व विद्यमान कनिष्ठ पर्यवेक्षक संदीप यंदे, अनिल सनेर, ललित पाटील, चंद्रकांत घोडेराव हे उपस्थित होते. शारीरिक शिक्षण शिक्षक युनिटचे प्रमुख डॉ जितेंद्र लिंबकर यांनी त्यांना भावी आयुष्यासाठी आयुष्य शुभेच्छा दिल्या.