
छत्रपती संभाजीनगर ः भारतभर आयोजित करण्यात येणाऱ्या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून योग अँड स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन, सायकलिस्ट फाउंडेशन व क्रीडा भारती छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिजामाता कन्या प्रशाला सिडको व एनसीसी गर्ल्स बटालियन ७, एनसीसी बॉईज बटालियन ५० च्या विशेष सहकार्याने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सायकल रॅलीला सिडको हॉटेल लेमन ट्री पासून सुरुवात झाली. कॅनाट प्लेस, चिस्तिया चौक, बजरंग चौक, बळीराम पाटील शाळा चौकमार्गे जिजामाता कन्या प्रशाला येथे रॅली समाप्त करण्यात आली. महर्षी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस एम कुलकर्णी यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली तर जिजामाता कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका अरुणा पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.

या प्रसंगी सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ विजय व्यवहारे, क्रीडा भरतीचे उदय कहाळेकर, राजेंद्र वाणी, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, एनसीसीचे स्वप्नील कौलापूरे, गुरविंदर सिंग, प्रल्हाद आव्हाळे, पर्यवेक्षिका मीना पोपळघट, प्रसाद कोळेकर, डॉ प्रशांत महाले, डॉ अरुण गावंडे, सदानंद नागपूरकर, मनोज वडगावकर, भगवान मगर, धनंजय भाले, विवेक जोशी, सचिन गोडसे, प्रणिता बर्दापूरकर, सचिन जोशी, प्रा पठाण, अमोल महाले, जिजामाता कन्या प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती. या रॅलीत सर्वात लहान तनय व्यवहारेसह सायकलिक फाउंडेशन, एनसीसी मुले-मुली व विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.