
शहापूर (दौलत चव्हाण) ः जिंदल विद्या मंदिर वासिंद या विद्यालयात जिल्हा परिषद ठाणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, ठाणे अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन व ऑनलाईन नोंदणी प्रशिक्षण घेण्यात आले.
या कार्यक्रमासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूरचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, तालुका क्रीडा अधिकारी रुही शिंगाडे, क्रीडा मार्गदर्शक मनीषा मनाकर, श्रद्धा तळेकर, धर्मेंद्र यादव, ऑनलाईन मुख्य प्रशिक्षक प्रबोध सर, तालुका क्रीडा केंद्र प्रमुख भरत पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच शहापूर तालुक्यातील विविध शाळेतील ४५ क्रीडा शिक्षकांनी सहभाग घेतला आणि आपल्या समस्या व अडचणी उपस्थित करून शंका निरसन करून घेतले. खेळीमेळीच्या वातावरणात सभा व प्रशिक्षण पार पडले.