
गुजरात उपविजेता, गोवा संघ तृतीय
छत्रपती संभाजीनगर ः श्री क्षेत्र कुंतूगिरी,आळते येथे वेस्ट झोन आइसस्टॉक स्पर्धा पार पाडली. या स्पर्धेत ६ राज्यांमधून २१० खेळाडूनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले. गुजरात संघ उपविजेता ठरला. तृतीय पारितोषिक गोवा राज्याने संपादन केले.
वैयक्तिक टारगेट प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्राच्या प्रविणसिंह कोळी तर महिला गटात गायत्री लोळगे यांनी सुवर्ण पदक पटकाविले. ही स्पर्धा १६, १९, २३ वर्षांखालील व सीनियर या वयोगटात घेण्यात आली. त्यामध्ये टीम गेम, टीम टारगेट, टीम डिस्टेंस, वैयक्तिक टारगेट, वैयक्तिक डिस्टेंस या प्रकारात झाली.
खेळाडूंची निवड ही आगामी होणाऱ्या राष्ट्रीय आइसस्टॉक स्पर्धेसाठी होणार आहे. आईसस्टॉक हा भारतामध्ये लोकप्रिय होत असलेला हिवाळी खेळ आहे. हा खेळ मुख्यतः हिवाळी व उन्हाळी दोन्ही प्रकारात खेळला जातो. हा खेळ ऑलिंपिक संघटनेशी मान्यता असून भारतामध्ये हा खेळ खेलो इंडिया, पोलीस गेम्स, विद्यापीठ खेळ यामधे समाविष्ट आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य आइसस्टॉक संघटनेचे अध्यक्ष महेश राठोड, सचिव अजय सर्वोदय, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य इंगवले, संदेश भोजकर, डॉ प्रशांत पाटील, विकास वर्मा, महेश आनंदकर, प्रणव तारे उपस्थित होते.