< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); भारताच्या रग्बी संघाच्या सराव शिबिरासाठी बीडच्या ३ खेळाडूंची निवड – Sport Splus

भारताच्या रग्बी संघाच्या सराव शिबिरासाठी बीडच्या ३ खेळाडूंची निवड

  • By admin
  • August 1, 2025
  • 0
  • 52 Views
Spread the love

बीड (अविनाश बारगजे) ः नेताजी सुभाषचंद्रबोस क्रीडा संकुल (साई) कोलकत्ता, पश्चिम बंगाल येथे आयोजित १८ वर्षांखालील गटाच्या भारतीय संघाची निवड चाचणी संपन्न होत आहे. या निवड चाचणीसाठी पूर्ण भारत देशातील सर्वोत्कृष्ट २७ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये मोरया क्रीडा मंडळ बीड तसेच बीड जिल्हा रग्बी असोसिएशनचे कीर्ती किरण जाधव व दिपाली दिलीप ताठे या दोन खेळाडूंची निवड सराव शिबिरासाठी करण्यात आली आहे. 

सदरील सराव शिबीर हे ४० दिवस चालणार आहे. सदरील स्पर्धेत निवड होणारे खेळाडू आशियाई चॅम्पियनशिप १८ वर्षांखालील गटासाठी होनोट, चायना येथे होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तसेच २० वर्षांखालील मुले गटात सर्वोत्कृष्ट २४ खेळाडू संपूर्ण भारतातून निवडण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातून फक्त बीडच्या यश बालासाहेब जाधव या खेळाडूची निवड करण्यात आली आहे. २० वर्षांखालील गटाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा यावर्षी भारतातील राजगीर, बिहार येथे संपन्न होणार आहे. सदरील सराव शिबीर नेताजी सुभाषचंद्रबोस क्रीडा संकुल (साई) कोलकत्ता,पश्चिम बंगाल येथेच संपन्न होत आहे. मागील वर्षी १८ वर्षांखालील गटात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघात आपले स्थान निश्चित करून बीडच नव्हे तर मराठवाड्यातील रग्बी खेळातील प्रथम आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याचा मान यश जाधव या खेळाडूंनी मिळाला होता.

सर्व खेळाडूंना मोरया क्रीडा मंडळ बीडचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय रग्बी प्रशिक्षक तसेच बीड जिल्हा रग्बी मुख्य प्रशिक्षक नितीन येळवे (८२०८४४४८३६), रग्बी प्रशिक्षक तथा कारागृह पोलीस (बीड) शोएब खाटीक, तसेच अशोक चौरे सचिव मोरया क्रीडा मंडळ यांनी अतिशय उत्तम प्रशिक्षित केलेले आहे. तसेच हा खेळ शासनाच्या नौकरी मधील पाच टक्के आरक्षणात असल्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी आणि खेळाडूंनी यात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटने कडून करण्यात येत आहे.

या कामगिरीबद्दल बीड जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष इसाक शेख, सचिव महेश घुले, उपाध्यक्ष रमेश सानप, कोषाध्यक्ष हरिभाऊ बांगर, कार्याध्यक्ष नितीन येळवे, कारागृह पोलीस तसेच प्रशिक्षक शोएब खाटीक, प्रशिक्षक अशोक चौरे, मार्गदर्शन भगवानराव बागलाने, शिवराज देवगुडे, साईनाथ राजे (जालना), बाळासाहेब जाधव, किरण जाधव, दिलीप ताठे, मुकुंद घोडके, अनिरुद्ध बहीर, महादेव नरवडे, मंडळाचे सर्व राष्ट्रीय- राज्यस्तरीय रग्बी खेळाडू, राष्ट्रीय पंच संभाजी गिरे, इतर सर्व पदाधिकारी आणि समस्त मोरया क्रीडा मंडळ परिवार बीड आदींनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *