< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); अहिल्यानगरचा तिसरा आयएम सुयोग वाघचा नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार  – Sport Splus

अहिल्यानगरचा तिसरा आयएम सुयोग वाघचा नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार 

  • By admin
  • August 1, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

अहिल्या नगर ः बुद्धिबळ खेळाडू सुयोग वाघ याने नुकतेच आयएम टायटल पूर्ण केले असून तो अहिल्यानगर जिल्ह्याचा तिसरा आयएम ठरला आहे. सुयोगच्या अद्वितीय कामगिरीमुळे अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

अहिल्या नगर येथे झालेल्या राष्ट्रीय पंच परीक्षेत प्रशांत धंगेकर, मनीष जसवानी व देवेंद्र ढोकळे हे राष्ट्रीय पंच झाले. त्यांचा सुद्धा सत्कार यावेळी नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, डॉ. स्मिता वाघ, डॉ. संजय वाघ, प्रशिक्षक प्रकाश गुजराथी, नवनीत कोठारी, विशाल गुजराथी, दत्ता घाडगे, स्वप्निल भागूरकर आदी बुद्धिबळ प्रेमी, खेळाडू, पालक व कोचेस याप्रसंगी उपस्थित होते.

प्रास्ताविकात अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी सर्वांचे स्वागत केले. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन जे सहकार्य करत आहे त्यामुळे अहिल्यानगर मधील खेळाडू निरनिराळे विक्रम करत असल्याचे सांगितले. आपल्या सत्काराला उत्तर देताना सुयोग वाघ याने सांगितले की मला जे अहिल्या नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने सहकार्य केले त्यामुळे मी अहिल्या नगरचा तिसरा आय एम होऊ शकलो. त्याने विशेष अहिल्या नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांचे आभार मानले. त्यांनी जे कोचिंग कॅम्प अहिल्या नगर येथे भरवले व मला बाहेरगावी कोचिंगसाठी पाठवले त्यामुळे माझा हा प्रवास आनंददायी झाला.

सीनियर नॅशनल ऑर्बिटर झालेले मनीष जसवानी, प्रशांत गांगेकर व देवेंद्र ढोकळे यांनी शांतीकुमारजी मेमोरियल फाउंडेशन व अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांचे आभार मानून पुढे असेच सहकार्य करावे अशी विनंती केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले की अहिल्यानगर मध्ये लवकरच आम्ही जीएमचा कोचिंग कॅम्प भरवणार असून त्यात विविध खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहोत. तसेच दिवाळीनंतर क्लासिकल फिडे मानांकन स्पर्धा सुद्धा घेणार आहोत. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन अहिल्यानगर मधील बुद्धिबळ खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असे त्यांनी पुन्हा सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारूनाथ ढोकळे यांनी केले तर सुबोध ठोंबरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *