
तुळजापूर ः तुळजापूर येथे शालेय क्रीडा स्पर्धेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी सेवानिवृत्त प्रा संभाजीराव भोसले व नूतन तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार यांचा सर्व क्रीडा शिक्षकांच्या वतीने सतीश खोपडे, अनिल धोत्रे, विष्णू दळवी, इसाक पटेल, राजेश बिलकुले यांनी सत्कार केला.
या प्रसंगी अनंतकुमार दुरे, राजेश जगताप, मधुकर जाधव, जयहिंद पवार, मनोहर घोडके, बालाजी पवार, घोडके, कपिल सोनटक्के, जाधव, माने, मस्के, महामुनी, गाडे व तुळजापूर तालुक्यातील सर्व क्रीडा बांधव यावेळी उपस्थित होते. यावेळी शालेय स्पर्ध्येचे ठिकाण व तारखा जाहीर करण्यात आले. अशाप्रकारे बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. प्रास्ताविक गणेश पवार यांनी केले. सूत्रसंचालन जगताप यांनी केले. इसाक पटेल व बिलकुले यांनी आभार मानले.