
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आगामी एमसीए क्रिकेट हंगामात आणि बीसीसीआय हंगामात खेळाडूंच्या वयाबाबत कठोरता बाळगण्यात येणार आहे. विविध वयोगटात पात्र ठरू शकणाऱ्या खेळाडूंच्या जन्मतारखेची कट ऑफ डेट जाहीर करण्यात आली आहे.
अंडर १४ मुलांच्या गटासाठी १ सप्टेंबर २०११ ही कट ऑफ डेट असणार आहे. अंडर १५ मुलींच्या गटासाठी १-९-२०१० ते ३१-८-२०१४ ही कट ऑफ डेट असेल. अंडर १६ मुलांच्या गटात १-९-२०१० ते ३१-८-२०१२ ही कट ऑफ डेट असणार आहे. अंडर १९ मुले व महिला या गटासाठी १-९-२००७ ही कट ऑफ डेट असेल. अंडर २३ पुरुष व महिला गटासाठी १-९-२००३ ही कट ऑफ डेट ठेवण्यात आली आहे. अंडर १७ मुलींच्या गटासाठी १-९-२००८ ही कट ऑफ डेट असणार आहे. या प्रमाणे खेळाडू आपापल्या वयोगटात खेळू शकतील.