
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघटनेच्या वतीने नुकत्याच ठाणे येथे झालेल्या महाराष्ट्र संघ निवड चाचणी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचा युवा खेळाडू ओम किशोर देसलेने उत्कृष्ट कामगिरी करत मुलांच्या वैयक्तिक ट्रॅम्पोलिन राज्य संघात स्थान मिळवले.
ओम देसले हा डेहराडून येथे ७ ते १० ऑगस्टदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होईल. ओम हा विभागीय क्रीडा संकुल येथील फ्लोअर जिम्नॅस्टिक क्लबमध्ये नियमित सराव करतो. त्याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तनुजा गाढवे व राष्ट्रीय प्रशिक्षक ऋत्विक भाले यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्याच्या निवडीबद्दल क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याच्या यशाबद्दल महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक असोसिएशनचे सचिव डॉ मकरंद जोशी, जिल्हा सचिव हर्षल मोगरे, छत्रपती पुरस्कार विजेते आनंद थोरात आदींनी अभिनंदन केले.