
जळगाव ः वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मुंबई आयोजित आंतर जिल्हा १४ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत ३६ जिल्ह्यांमधून महाराष्ट्राचा संघ निवडीसाठी मुलींची निवड करण्यात आली असून त्यात जळगाव जिल्ह्यातून पोदार इंटरनॅशनल शाळेची व उदय स्पोर्ट्स क्लबची खेळाडू दिव्या रुपेश बाविस्कर हिची निवड झाली आहे.
जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे तिला शुभेच्छा व निरोप देण्यात आला. यावेळी फुटबॉल संघटनेच्या कार्याध्यक्ष डॉ अनिता कोल्हे, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या क्रीडा विभागाच्या मुख्य क्रीडा विभाग प्रमुख छाया बोरसे व संघटनेचे सचिव फारुख शेख यांची उपस्थिती होती.
कुपरेज फुटबॉल ग्राउंडवर शिबीर
४ ते २० ऑगस्ट मुंबई येथील कूपरेज फुटबॉल मैदानावर प्रशिक्षण शिबीर होत असून २२ ते ३० ऑगस्ट आसाम येथे राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिव्या बाविस्कर हिच्या निवडीबद्दल पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य गोकुळ महाजन, उदय स्पोर्ट्सचे उदय फालक, फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष जफर शेख, संघटना महिला क्रीडा विभाग प्रशिक्षिका हिमाली बोलले, मुख्य प्रशिक्षक राहील अहमद, संघटनेचे वसीम शेख, अरबाज खान, मनोज सुरवाडे, भास्कर पाटील, ॲड आमिर शेख, शेखर देशमुख, डॉ अनिता कोल्हे, इम्तियाज शेख यांनी अभिनंदन केले आहे.