< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); स्वातंत्र्य दिनानिमित्त ९ ऑगस्टला रंगणार देश मेरा रंगीला – Sport Splus

स्वातंत्र्य दिनानिमित्त ९ ऑगस्टला रंगणार देश मेरा रंगीला

  • By admin
  • August 3, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

युवा मित्र फाऊंडेशनतर्फे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सर्वात मोठा देशभक्तीचा १२ वा तपपूर्ती सोहळा यंदा विद्यार्थी कलावंतांच्या बहारदार सादरीकरणाने रंगणार आहे. “देश मेरा रंगीला” या देशभक्तीपर आंतर शालेय व महाविद्यालयीन नृत्य व गीत गायन स्पर्धा शनिवार, ९ ऑगस्ट रोजी संत एकनाथ रंग मंदिर येथे सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान होईल.

युवा मित्र फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये विद्यार्थी कलावंतानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक सचिन अंभोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. आपल्या धाडसी कर्तुत्वाने भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली. भारताच्या सरक्षणार्थ शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देत त्यांच्या शौर्याचे स्मरण करत “देश मेरा रंगीला” हा स्पर्धा कार्यक्रम सादर करण्यात येत आहे. त्याचबरोबर शासनाच्या वतीने “हर घर तिरंगा” या अभियानाची जनजागृती या स्पर्धेतून केली जाणार आहे.

देशभक्तीची भावना प्रत्येक विद्यार्थी, तरुणांमध्ये जागृत व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाच्या तपपूर्ती सोहळ्यानिमित्त युवा मित्र फाऊंडेशनच्या वतीने “देश मेरा रंगीला’’ या आंतर शालेय, महाविद्यालयीन नृत्य व गीत गायन स्पर्धेचे आयोजन नेहरू युवा केंद्र, भारत सरकार, यांच्या सहकार्याने बिपीन मोशन पिक्चर्स, वेब न्युज लाईव्ह महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून कलाक्षेत्रात योगदान देणाऱ्या शहरातील कलावंतांचा यावेळी सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती युवा मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आयोजक सचिन अंभोरे यांनी दिली.

या कार्यक्रमात समुह नृत्यासाठी शहरातील शाळा/महाविद्यालय तसेच विविध खाजगी डान्स ग्रुप सहभागी होणार असून शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटात या स्पर्धा होतील. यामध्ये नर्सरी ते ४ थी अ गट, ५ वी ते १० वी ब गट आणि महाविद्यालयीन, खुल्या डान्स ग्रुप साठी क गट असेल. प्रत्येक विजेत्या स्पर्धक व संघास स्मृतिचिन्ह तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन युवामित्र फौंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9970409640 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *