
गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर संघ उपविजेता, टेंडर केअर होम तृतीय
छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल करंडक स्पर्धेत डिफेन्स करिअर अकॅडमी संघाने विजेतेपद पटकावले.

सतरा वर्षांखालील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात घेण्यात आली. या स्पर्धेत डिफेन्स करिअर अकॅडमी संंघाने विजेतेपद पटकावले. वेरुळ येथील गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर संघाने उपविजेतेपद संपादन केले. टेंडर केअर होम स्कूल संघाने तिसरा क्रमांक संपादन केला.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शेख इमाद, शेख अहमद, अर्शद शेख, अलीम शेख अनिस, शेख उमेर, शेख अदनान सिकंदर, सादात खान, मोहम्मद जुनेद, प्रणव तारे आदींनी परिश्रम घेतले. विजयी संघांना क्रीडा अधिकारी रेखा परदेशी व जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.