
मराठवाडा मूकबधिर क्रीडा मंडळ व असोसिएशनचा मेळावा उत्साहात
छत्रपती संभाजीनगर ः समाजात वावरताना आजही अंध, अपंग, मूकबधिर आदी दिव्यांग बांधवांच्या समस्या सातत्याने जाणवत असतात. ३४ वर्षांपासून यासाठी मराठवाडा मूकबधिर क्रीडा मंडळ व असोसिएशनच्या माध्यमातून अनेकांना नोकरी, व्यवसाय आणि मुख्य म्हणजे समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. हा काळ संघर्षाचा होतो, मात्र, अनेक दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांनी दातृत्व दाखवत संघटनेला मदत केली. यामुळे आज हजारो मूकबधिर नोकरी आणि संसारला लागल्याचे समाधान आहे. यापुढे त्यांच्या अडीअडीचणी, समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याची भावना डॉ प्रदीप दुबे यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत दर रविवारी बैठकीसाठी व्यवस्था करण्यात आली. यानिमित्त रविवारी मराठवाडा मूकबधिर क्रीडा मंडळ व असोसिएशनचा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी व्यंकटेश देशमुख हे जिल्हा परिषद बीड येथून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा व शारदा देशमुख या दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील व तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
बैठकीस शिरीष कुलकर्णी, सचिन गोडसे, सतीश रुद्रवार, मोहम्मद युनूस, मोहम्मद शाजिया, अनिता रुद्रवार, मोहम्मद अनिस, दीपक पारखे, रूपाली थोरात, संजीव दहिवाळ, शिवाजी बोरुडे, महेंद्र कांबळे, शेख जबीन, जे सय्यद, सोनिका साहुजी, मोहम्मद फरीद, शंकर चव्हाण, नरेंद्र निसळ, मोहम्मद फय्याज, दिनकर हाडे, ताहेर चाऊस, विजय मालोदे, बंडू क्षीरसागर, विनोद गायकवाड, एच अब्दुल, शाम्मा शेख, शहनाज शेख, चांद शेख, कविता कुलकर्णी, कीर्ती देशपांडे, सचिन गोडसे, प्रीतम मुथा, वहाजोद्दीन खान, तिखार हुसैन, नवनाथ सातपुते, मधूकर सातपुते, राहुल सपकाळ, अस्मिता श्रीसुंदर, मिल्स श्रीसुंदर, चंद्रकांत कुलकर्णी, बलराम बरेटिये, चंदन परदेशी, मयूर दरख, मोनाली दरख, सचिन कुलकर्णी, संजय परदेशी, जब्बार कुरेशी, नजमा मोहम्मद, यासिन कलानिया, एस आर दहातोंडे, संतोष घोडके, भाऊसाहेब खिल्लारे, शोभा गायकवाड, कुशील लोलेवार, बाबासाहेब आठवे, रुपेश साहुजी, करुणा व्यास, केशव व्यास आदींसह मराठवाडा मूकबधिर क्रीडा मंडळ व असोसिएशनचे सदस्यांनी सहभाग नोंदविला.