
छत्रपती संभाजीनगर ः बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ क्रीडा विभागातील व्हॉलिबॉल प्रशिक्षक डॉ. अभिजीतसिंह ब्रिजमोहनसिंह दिख्खत यांना शारीरिक शिक्षण या विषयात पीएचडी पदवी प्राप्त झाली. त्यांनी डॉ प्रदीप दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रोल ऑफ कॉन्ट्रीबुशन ऑफ हेमलता उर्सल विथ स्पेशल रेफरन्स टू हॉलिबॉल’, या विषयात आपले संशोधन कार्य पूर्ण केले.
या यशाबद्दल त्यांना विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू व कुलसचिव तसेच विद्यापीठ प्रभारी क्रीडा संचालक डॉ सचिन देशमुख, विद्यापीठ क्रीडा प्रशिक्षक डॉ मसूद हाशमी, सुरेंद्र मोदी, किरण शुरकांबळे, क्रीडा विभागातील गणेश कड, डॉ रामेश्वर विधाते, मोहन वहिलवार इतर सर्व सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.