
छत्रपती संभाजीनगर ः जळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र सब ज्युनियर स्टेट बॉक्सिंग स्पर्धेत श्री सरस्वती भुवन प्रशाला छत्रपती संभाजीनगरची इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी ओवी अभिजीत अदवंत हिने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
ओवी हिची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली असून ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान नोएडा (उत्तरप्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये ती महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. ओवीच्या या शानदार यशाबद्दल शालेय समिती अध्यक्ष ज्ञानप्रकाश मोदाणी, मुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ, उपमुख्याध्यापक अनिल देशमुख, पर्यवेक्षक संजय परदेशी आणि विजयकुमार चापाईकर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
ओवीला क्रीडा शिक्षक संजय कंटुले, चंद्रशेखर पाटील, सुरेश मस्के आणि सुरज सुलाने यांचे मार्गदर्शन लाभत आहे.