
मुंबई ः जुहू विले पार्ले जिमखाना तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या विद्यमाने १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान जुहू विले पार्ले जिमखाना (एसी) हॉल, प्लॉट क्रमांक १३, एन एस रोड क्रमांक १३, जुहू बस डेपोच्या समोर, जुहू, मुंबई – ४०००४९ येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटात ही कॅरम स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या ८ खेळाडूंना मिळून एकंदर १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे सायंकाळी ६ ते ८ दरम्यान उपलब्ध असून स्पर्धेत नावे नोंदविण्याची अंतिम तारिख ६ ऑगस्ट २०२५ आहे. भाग घेण्यासाठी खेळाडूंनी आपल्या जिल्हा संघटनेशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा.