
नाशिक ः सतरा वर्षांखालील टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत संताजी इंग्लिश मीडियम स्कूल (वणी) संघाने विजेतेपद पटकावले. निफाडच्या सरस्वती विद्यालय संघाने मुलींच्या गटात विजेतेपद संपादन केले.
टेनिस क्रिकेट असोशियन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक जिल्हा आयोजित १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी नाशिक येथील दत्ता मोगरे स्टेडियम नाशिक येथे उत्साहात संपन्न झाली.
जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी, टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विलास गिरी, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड, सहसचिव धनंजय लोखंडे, क्रीडा शिक्षक मुकेश सोनवणे, राहुल परदेशी, संदीप बोरसे, अनिता गणोरे, प्रशांत आढाव, कीर्तविजय घोटेकर इत्यादी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातून व इतर तालुक्यातून एकूण १०९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या निवड चाचणीसाठी नाशिक जिल्ह्यातून, नांदगाव, निफाड, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, देवळा या ठिकाणचे विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.
भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी यांनी विद्यार्थ्यांना टेनिस खेळाबद्दल माहिती महत्त्व व नियमावली सांगितली. तसेच भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी, जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी सर्व विजेत्या संघांचे अभिनंदन केले.
या स्पर्धेत पंच म्हणून धनंजय लोखंडे, विजय घोटेकर, राजेंद्र सांगले, सनी बलसाने यांनी काम बघितले. या स्पर्धेतून सोलापूर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक संघ नेतृत्व करणार आहे. ही स्पर्धा यशस्वी पार करण्यासाठी नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव विलास गायकवाड यांनी पुढाकार घेतला.
अंतिम निकाल
मुलांचा गट ः १. संताजी इंग्लिश मीडियम स्कूल, वणी, २. क्रीडा सह्याद्री निफाड, ३. बालभारती पब्लिक स्कूल दिंडोरी.
मुलींचा गट ः १. सरस्वती विद्यालय निफाड, २. वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूल.