
मुंबई ः सोमेश्वर फाऊंडेशनच्यावतीने व झेनेटीक स्पोर्ट्सच्या सहकार्याने गोविंदा गार्डन मंगल कार्यालय, सोमेश्वर कॉर्नर, बाणेर, पुणे येथे ८ ते १० ऑगस्ट दरम्यान रंगणाऱ्या दुसऱ्या विनायक निम्हण स्मृती राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटात मुंबईच्या विश्व विजेत्या प्रशांत मोरे तर महिला एकेरी गटात ठाण्याच्या सम्रुद्धी घाडिगावकरला प्रथम मानांकन देण्यात आले आहे.
८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता पुरुष एकेरी गटाने स्पर्धेला सुरुवात होणार असून महिला एकेरी गटाचे सामने ९ तारखेपासून खेळविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातून जवळपास १८० खेळाडूंनी भाग घेतला आहे. विजेत्यांना १ लाख १० हजारांच्या रोख पारितोषिकांनी गौरविण्यात येणार असल्याचे सोमेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण यांनी सांगितले.
खेळाडूंना मानांकन
पुरुष एकेरी : १) प्रशांत मोरे (मुंबई), २) झैद अहमद फारुकी (ठाणे), ३) विकास धारिया (मुंबई), ४) समीर अंसारी (ठाणे), ५) राहुल सोलंकी (मुंबई), ६) रियाझ अकबर अली (रत्नागिरी), ७) अभिषेक चव्हाण (रत्नागिरी), ८) अभिजित त्रिपनकर (पुणे).
महिला एकेरी : १) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), २) आकांक्षा कदम (रत्नागिरी), ३) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ४) अंबिका हरिथ (मुंबई), ५) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग), ६) नीलम घोडके (मुंबई), ७) मधुरा देवळे (ठाणे), ८) उर्मिला शेंडगे (मुंबई).