
पुरुष गटात उपविजेतेपद तर महिला गटात कांस्यपदक
धुळे ः नेटबॉल फेडरेशन इंडियाच्या वतीने चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात नेटबॉल स्पोर्ट्स प्रमोशन असोसिएशनतर्फे आयोजित सातवी पुरुष व बारावी महिला अखिल भारतीय आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत पश्चिम विभागाचे पुरुष व महिला दोन्ही संघ सहभागी झाले होते. त्यात पुरुषांनी रौप्यपदक व महिलांनी कांस्यपदक पटकावित दुहेरी यश प्राप्त केले.
महाराष्ट्राच्या पुरुष संघात दिग्विजय आटोळे, आकाश गायकवाड, आदित्य ठाकूर व सर्वज्ञ भोपाळे आणि महिला संघात गौरी शेंडे, शरयू जगताप, साक्षी पाटील, पियुषा लोणकर, दिक्षा बडे या नऊ खेळाडूंचा समावेश होता. विजेत्या संघातील खेळाडूंना चंदीगड नेटबॉल असोसिएशनचे सचिव पी. एस. लांबा नेटबॉल फेडरेशन इंडियाचे सचिव विजेंदरजी सिंग, सहसचिव विक्रमादित्य, पंच मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक आनंद यांच्या हस्ते चषक व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

नेटबॉल डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन हरीओम कौशीक, नेटबॉल फेडरेशन इंडियाच्या अध्यक्षा सुमन कौशिक, महाराष्ट्र अॅम्युचर नेटबॉल असोसिएशनच्या अॅड हाॅक कमिटीचे अध्यक्ष डॉ एस एन मूर्ती, संयोजक ऋतुराज यादव, सदस्य पवनकुमार पटले व नेटबॉल फेडरेशन इंडियाचे निरीक्षक एस मोहन राव यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
कांस्यपदक विजेत्या महिला संघात धुळे शहराच्या मोहाडी उपनगरातील पिंपळादेवी संकुल धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनचे सचिव योगेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारी सर्वोत्कृष्ट गोल शुटर साक्षी संजय पाटील हिचा समावेश होता. तिच्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी एम के पाटील, संस्थाध्यक्ष विनायक शिंदे, कुणाल पवार, आकाश शिंदे, संचालक एस बी पाटील, एस डी बाविस्कर, व्यवस्थापक आर व्ही पाटील, समन्वयक विलास बोरसे, मुख्याध्यापक के आर सावंत, उपमुख्याध्यापक एस एस पाटील, अविनाश वाघ, महेंद्र गावडे, निलेश चौधरी, वैशाली वाघ, शितल वाघ व अक्षय हिरे यांनी कौतुक केले.