
ठाणे ः प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन व अथेना ग्लोबल स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युथ अॅथलेटिक्स अजिंक्यपद आंतरशालेय स्पर्धेत एसएमएम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, ठाणे येथील विद्यार्थी अथर्व रवींद्र परब याने रौप्यपदक पटकावले.
या स्पर्धेत अथर्व परब याने गोळा फेक प्रकारात सहभाग घेत रौप्य पदकाची कमाई करुन स्पर्धा गाजवली. ही जिल्हास्तरीय स्पर्धा दिनांक २ ऑगस्ट रोजी संपन्न झाली. अथर्व परब याने दाखवलेल्या उत्कृष्ट खेळाची दखल सर्वत्र घेतली जात असून त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या सातत्यपूर्ण सरावासह, मार्गदर्शन करणारे शाळेचे क्रीडा शिक्षक प्रमोद वाघमोडे यांना ही जाते.
या स्पर्धेचे आयोजन प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते. संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये प्रमुख विश्वस्त रुपाली ठाकूर, वैशाली बर्वे व महादेव रानडे यांचा समावेश होता. अथर्वच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालकवर्ग आणि मित्रपरिवाराने त्याचे अभिनंदन केले आहे.