
पुणे : पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या सहकार्याने पूना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, कॅम्प पुणे येथे कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय कॅडेट कोर अंतर्गत गुणवत्ता हमी प्रकोष्ठ आणि फिट इंडिया चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थमुक्ती जनजागृती अभियान – फ्रीडम फ्रॉम ड्रग्स या विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम प्राचार्य डॉ इक्बाल शेख व अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून मोहिनी भोसले यांनी अंमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. समुपदेशक सीमा मरळ (जिल्हा रुग्णालय, औंध) यांनी मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे होणारे परिणाम स्पष्ट करत आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन केले. पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांनी अंमली पदार्थविषयक कायदे व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे कार्य याबाबत सखोल माहिती दिली.
डॉ बाबा शेख यांनी विद्यार्थ्यांकडून नशामुक्तीची शपथ घेतली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य प्रा. इम्तियाज आगा यांनी भूषवले. सूत्रसंचालन प्रा जुबेर पटेल यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन युनिट कार्यक्रम अधिकारी प्रा अशद शेख यांच्या नेतृत्वाखाली झाले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एनसीसी प्रमुख सब लेफ्टनंट डॉ मोहम्मद शाकीर हुसेन, सुपरव्हायझर नसीम खान, वसुधा व्हावल, प्रा समीर रंगरेज, जाएबा दफेदार, डॉ रफिक सय्यद, सबा हुसैन, अमित खराडे व क्रीडा शिक्षक इम्रान पठाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.