
प्रज्वल गाजरे, वेदांत शेजवळची राज्य स्पर्धेसाठी निवड
निफाड (विलास गायकवाड) ः टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित १७ वर्षांखालील टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत निफाडच्या क्रीडा सह्याद्री क्लबने मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले तर मुलांच्या संघाने उपविजेतेपद संपादन केले.
निवड चाचणी स्पर्धा नाशिक येथील दत्ता मोगरे स्टेडियम येथे संपन्न झाली. त्यामध्ये निफाड येथील क्रीडा सह्याद्री क्लबने मुलींच्या संघाने विजेतेपद आणि मुलांचा संघ उपविजयी झाल्याबद्दल त्यांचे निफाड शहरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे. जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी, टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विलास गिरी, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड, सहसचिव धनंजय लोखंडे, क्रीडा शिक्षक मुकेश सोनवणे, राहुल परदेशी, संदीप बोरसे, अनिता गणोरे, प्रशांत आढाव, विजय घोटेकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातून व इतर तालुक्यातून एकूण १०९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या निवड चाचणीसाठी नाशिक जिल्ह्यातून, नांदगाव, निफाड, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, देवळा या ठिकाणचे खेळाडू सहभागी झाले होते. या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या मुलींचा अंतिम सामना क्रीडा सह्याद्री आणि वैनतेय इंग्लिश मीडियम यांच्यात झाला. क्रीडा सह्याद्रीच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद पटकावले. क्रीडा सह्याद्रीच्या मुलांच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
क्रीडा सह्याद्री संघाने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल क्रीडा सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष विलास गायकवाड, सदस्य विनोद गायकवाड, चेतन कुंदे, दत्तू रायते, रमेश वडघुले, प्रतीक्षा कोटकर, विजय घोटेकर, कीर्ती कोटकर, श्याम चौधरी, लखन घटमाळे यांनी सर्वांनी सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. क्रीडा प्रशिक्षक विलास गायकवाड यांचे सर्व संघाला मार्गदर्शन लाभले.